#Tokyo Olympic – हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाची लढत आता कांस्य पदकासाठी

Gurjit scoring today against argentina

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये फिनिक्स भरारी घेत उपांत्य फेरित धडक मारली. मात्र अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघासमोर दमदार खेळ करताना हिंदुस्थानचा 2-1 अशा फरकाने पराभव झाला. या पराभवानंतर देखील कांस्य पदकाच्या आशा जिवंत आहेत. त्यांना आता ग्रेट ब्रिटनच्या विरुद्ध सर्व ताकद एकवटावी लागणार आहे.

41 वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपात्या फेरी गाठलेल्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

खेळाला सुरुवात होताच हिंदुस्थानी संघाकडून पहिला गोल गुरजीत कौरने दणक्यात गोल केला आणि अर्जेंटिना विरोधात 1-0 अशी आघाडी घेतली. यामुळे हिंदुस्थानच्या आशा वाढल्या. त्यानंतर हिदुस्थानी संघाने चांगला खेळ करत अर्जेटिनावर दबाव ठेवाला होता. मात्र अर्जेंटिनाने पेनल्टी कॉर्नरचा फायदा उचलत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या क्वाटरमध्ये अर्जेंटिंनाने गोल मारत बरोबरी साधली. मध्यांतर होईपर्यंत 1-1 असा स्कोअरबोर्ड होता. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाने दुसरा गोल केला आणि 2-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर हिंदुस्थानच्या संघाला खेळात परतता आले नाही.

ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी

womens-team-india

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात कधीच अंतिम फेरी पर्यंतचा प्रवास केलेला नव्हता. हिंदुस्थानी महिलांनी 1980 साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता. त्या वेळी स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ होय. याआधी, 1980 व 2016च्या ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी महिला सहभागी झाल्या होत्या. गत रियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी महिला हॉकी संघाच्या विजयाची पाटी कोरी राहिली होती अन् हा संघ अखेरच्या 12व्या स्थानी राहिला होता.

उपांत्यपूर्व फेरीत काय घडलं होतं?

हिंदुस्थानी महिलांनी पहिल्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाला वर्चस्व गाजविण्याची संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक चालीला त्यांनी तोडीस तोड प्रत्युत्तर दिले. दुसऱ्याच मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीने हिंदुस्थानच्या गोलपोस्टवर हल्ला चढवला. मात्र हिंदुस्थानच्या संरक्षण फळीने हे आक्रमण परतावून लावले. मग नवव्या मिनिटाला हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर चढाई केली. पण वंदना कटारियाच्या पासवर कर्णधार राणी रामपाल हिला गोल करण्यात अपयश आले. मात्र हिंदुस्थानचा अनपेक्षित आक्रमक पवित्रा पाहून ऑस्ट्रेलियन महिला बुचकळ्यात पडल्या.

गुरजीतचा गोल्डन गोल

दुस्थानी महिलांच्या आक्रमक खेळामुळे दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळात थोडा विस्कळीतपणा आला. याचा फायदा हिंदुस्थानला 22व्या मिनिटाला झाला व त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. गुरजीत कौरने ऑस्ट्रेलियाची बचाव फळी भेदत जबरदस्त गोल केला. पहिला गोल झाल्यानंतर काही वेळातच हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला. मोनिका मलिकला ग्रीन कार्ड दाखवण्यात आल्याने तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि हिंदुस्थानी संघाला 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले. मात्र तरीही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत हिंदुस्थानने 1-0 अशी आघाडी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.

tokyo olympic womens hockey team will fight for bronze.

 

आपली प्रतिक्रिया द्या