Tokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाने दणदणीत सुरूवात केली आहे. त्यांनी न्यूझीलंडच्या संघाचा सलामीच्या सामन्यातच पराभव केला आहे. हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडला 3-2 ने पराभूत केलं. हरमनप्रीत हा या विजयाचा शिल्पकार ठरला. हरमनप्रीतने 2 गोल करत संघाला विजय मिळवून देण्याच मोलाची भूमिका बजावली. हिंदुस्थानी संघ रविवारी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी या विजयानंतर हिंदुस्थानच्या हॉकी संघाचे ट्विटरवरून कौतुक केले आहे.

10 मीटर एअर रायफल पात्रता फेरीत एलावेनील वालारीवान आणि अपूर्वी चंडीला या दोघींनी निराशा केली. वालारीवान हिला 626.5 गुण कमावता आले आणि ती 16 व्या स्थानी होती. अपूर्वी हिला 621.9 गुण कमावता आले ज्यामुळे ती 36 व्या स्थानी होती. या फेरीत एकूण 50 स्पर्धकांचा समावेश होता. तिरंदाजीच्या मिश्र गटात दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांनी पिछाडी भरून काढत तैवानच्या संगाला मागे टाकले आणि मिश्र गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

मीराबाई चानू आज इतिहास रचणार? 49 किलो वजनी गटात पदक जिंकण्याची संधी

हिंदुस्थानकडे टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱयाच दिवशी पदक जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग या खेळात महिलांच्या 49 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. मीराबाई चानू हिने हिंदुस्थानला आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून दिले आहेत. त्यामुळे आता मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचणार का, याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

आज हिंदुस्थान

बॅडमिंटन

 • पुरुष दुहेरी (सकाळी 8.50 वाजता) (सात्त्विक रेड्डी-चिराग शेट्टी)
 • पुरुष एकेरी (सकाळी 9.30 वाजता) -(साई प्रणीत)

बॉक्सिंग

 • महिला गट (सकाळी 8 वाजता)- लोवलीना बोर्गोहेन
 • पुरुष गट (सकाळी 9.54 वाजता)- विकास क्रिशन

हॉकी

 • महिला गट (सायंकाळी 5.15 वाजता)- हिंदुस्थान-नेदरलॅण्ड

ज्युडो 

 • महिला गट (सुशीला देवी) (सकाळी 7.30 वाजता)

रोइंग

 • पुरुष गट (अर्जुन लाल, अरविंद सिंग)  (सकाळी 7.50 वाजता)

नेमबाजी

 • पुरुष 10 मीटर एअर पिस्तोल, सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा (सकाळी 9.30 वाजता)

टेबलटेनिस

 • पुरुष व महिला एकेरी (पहाटे 5.30 वाजता)
 • मिश्र दुहेरी (7.45 वाजता)

वेटलिफ्टिंग 

 • मीराबाई चानू (महिला गट) (सकाळी 10.20 वाजता)

टेनिस

 • महिला दुहेरी व पुरुष एकेरी  (24 जुलै ते 1 ऑगस्ट)
आपली प्रतिक्रिया द्या