हिंदुस्थानी महिला हॉकी संघ लढला, अर्जेंटिना 2-1 अशा फरकासह अंतिम फेरीत

कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक मारून सर्कांनाच चकीत केले. रानी रामपालच्या हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीतही जागतिक रँकिंगमध्ये दुसऱया क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाला कडवी झुंज दिली. 35व्या मिनिटापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना 1-1 अशा बरोबरीत रोखले. पण हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची ही झुंज अपयशी ठरली. कर्णधार नोएल बॅरीयोन्युको हिने निर्णायक क्षणी केलेले दोन भन्नाट गोल क गोलकिपर बेलेन सुक्की हिचा अभेद्य बचाव याच जोरावर अर्जेंटिनाने हिंदुस्थानला 2-1 असे हरवले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता नेदरलॅण्ड आणि अर्जेंटिना यांच्यात सुवर्ण पदकासाठी झुंज रंगेल. तसेच हिंदुस्थान-ग्रेट ब्रिटन यांच्यात कास्य पदकासाठी लढत होईल. या दोन्ही लढती 6 ऑगस्टला रंगणार आहेत.

विजयी गोल

अर्जेंटिनाची कर्णधार नोएल बॅरियोन्युका पुन्हा एकदा संघासाठी धावून आली. तिसऱया क्वाॅर्टरमध्ये तिने ड्रग फ्लिकवर अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला. त्यामुळे अर्जेंटिनाला 2-1 अशी आघाडी घेता आली. चौथ्या क्कॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाकडून करण्यात आलेला दुसरा गोल हा विजयी गोल ठरला. हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने बरोबरीसाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांना यश
मिळाले नाही.

दुसऱया क्वाॅर्टरमध्ये बरोबरी

अर्जेंटिनाची कर्णधार नोएल बॅरीयोन्युको हिने 18व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरकर गोल करीत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱया क्वाॅर्टरमध्ये दोन्ही संघांमधील ही बरोबरी कायम राहिली. त्यामुळे हाफटाईममध्ये दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते.

महिला हॉकीच्या लढती खालीलप्रमाणे

  • नेदरलॅण्ड-अर्जेंटिना (फायनल)
  • हिंदुस्थान-ग्रेट ब्रिटन (कास्य पदकासाठी लढत)

(टीप – दोन्ही लढती सहा ऑगस्टला होतील)

पुरुष हॉकीच्या लढती खालीलप्रमाणे

  • ऑस्ट्रेलिया-बेल्जियम (फायनल)
  • हिंदुस्थान-जर्मनी (कास्य पदकासाठी लढत)

(टीप – दोन्ही लढती 5 ऑगस्टला होतील)

दुसऱयाच मिनिटाला आघाडी

बलाढय़ ऑस्ट्रेलियाला उपांत्यपूर्क फेरीत धूळ चारणाऱया हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची उपांत्य फेरीची सुरुवात दमदार झाली. गुरजीत कौरने दुसऱयाच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर शानदार गोल करीत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानी संघाने पहिल्या क्वाॅर्टरमध्ये ही आघाडी कायम ठेवली.

41 वर्षांनंतर पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार

हिंदुस्थानी पुरुषांचा हॉकी संघ उद्या तब्बल 41 कर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हिंदुस्थान-जर्मनी यांच्यात कास्य पदकासाठी उद्या लढत पार पडणार आहे. या लढतीत विजयी होणारा संघ कास्य पदकाचा मानकरी ठरेल. तसेच ऑस्ट्रेलिया-बेल्जियम यांच्यामधील विजयी संघाला सुवर्ण पदक मिळेल. या लढतीत पराभूत झालेल्या संघाला रौप्य पदक जिंकता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या