Tokyo Olympic सिंधू फायनलच्या रेसमधून बाहेर, आता कांस्यपदकासाठी लढणार

हिंदुस्थानची आघाडीची महिला बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) हिच्याकडून 130 कोटी देशवासियांना यंदा सुवर्णपदकाची आशा होती. मात्र या आशांना चिनी ताईपेच्या खेळाडूने सुरुंग लावला. शनिवारी झालेल्या सेमीफायनल लढतीत चिनी ताईपेची खेळाडू ताई जू यिंग (Tai Tzu-Ying) हिने पी. व्ही. सिंधू हिचा दोन सेटमध्ये सरळ पराभव केला. या पराभवामुळे सिंधू फायनलच्या रेसमधून बाहेर झाली असून आता कांस्यपदकासाठी ती झुंजताना दिसेल.

चिनी ताईपेची खेळाडू ताई जू यिंग ही जागतिक बॅडमिंटन क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना सिंधूसाठी आव्हानात्मक असणारे हे स्पष्ट होते. पहिल्या सेटमध्ये सिंधूने ताई जू यिंग हिला जोरदार टक्क दिली. मात्र ताईने हा सेट 21-18 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूचा खेळ आणखी खालावला आणि ताईने हा सेट 21-12 असा आपल्या नावावर करत सामनाही जिंकला.

चीनच्या खेळाडूशी रंगणार सामना

दरम्यान, रिओ ऑलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू हिचे सुवर्णपदकावर मोहोर उमटवण्याचे स्वप्न भंगले असले किमान कांस्यपदक जिंकण्याची संधी तिच्याकडे आहे. कांस्यपदकासाठी तिची लढत आता चीनची खेळाडू ही बिंग झाओ (HE Bing Jiao) हिच्यासोबत होणार आहे.

पुजा राणी पराभूत

दुसरीकडे बॉक्सिंगमध्येही हिंदुस्थानच्या हाती निराशा लागली. 75 किलो ग्राम वर्गात पुजा राणी हिला चीनच्या ली कियान हिने 5-0 असे पराभूत केले.

आपली प्रतिक्रिया द्या