#Corona देशभरातील महामार्गांवरील टोलनाके काही दिवसांसाठी बंद

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण हिंदुस्थानात लॉकडाऊन लागू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके बंद करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही हे टोल रद्द केल्याचे जाहीर केले आहे.

‘कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील टोलनाके बंद करण्यात येत आहे. यामुळे इमरजन्सीच्या वेळी वाहतूकीत कोणताही अडथळा येणार नाही तसेच महत्त्वाचा वेळ देखील वाचेल’, असे गडकरी यांनी ट्विट केले आहे. टोल नाके बंद झाले तरी त्याचा रस्त्यांच्या मेन्टेनेन्सवर परिणाम होणार नाही असं देखील स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या