नाशिकच्या रस्त्यावर लाल चिखल, टॉमेटोचे दर 2 रूपये किलोपर्यंत घसरले

नारायणगावमधील येडगांव इथे शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडून मार्केटला न नेता शेताच्या बांधावर टाकून आपला निषेध नोंदवला

सामना ऑनलाईन, नाशिक

आवक कमी असतानाही मागणी नसल्याने नाशिक घाऊक बाजारात टॉमेटोचे दर २ रुपये किलोपर्यंत खाली घसरले आहेत. लागवडीचा खर्च भरून निघणं दूरच राहीलं मात्र जबरदस्त तोटा सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांनी टॉमेटो रस्त्यावर फेकून द्यायला सुरूवात केली आहे.

२८ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रात टोमॅटोच्या क्रेट ला 50 ते 150 रू. असा बाजारभाव मिळत होता. तेव्हा टॉमेटोचा प्रति किलो दर हा अडीज रुपये इतका होता. चार दिवसात हा दर आणखी खाली घसरला आहे. गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला फायदा झाला होता. या वर्षी टोमॅटोसोबतच मेथी, कोथंबीर, शेपू या भाज्यांचे दरही कोसळले आहेत.