भरून ठेवा… जपून वापरा, उद्या आणि परवा अर्ध्या मुंबईत पाणी नाही

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील जलवाहिन्यांवर झडपा बसवणे, नवीन जलजोडण्या करणे, गळती रोखणे आणि दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने मुंबईच्या 24 पैकी 12 वॉर्डमध्ये 30 आणि 31 जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काम होणाऱ्या नऊ विभागांत पूर्णपणे तर तीन विभागांत 25 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.