Toolkit – दिल्ली पोलिसांना धक्का, दिशा रवीला जामीन

टूलकिट प्रकरणात पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला जामीन मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) दिशा रवीला जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशा रवीला 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, दिशा रवीने आपल्यावरील सर्व आरोप शांतनू मुळूक आणि निकिता जेकब यांच्यावर ढकलले आहेत. यानंतर दिल्ली पोलिसांनी निकिता जेकहब, शांतनू मुळूक आणि दिशा रवी यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. जवळपास पाच तास ही चौकशी सुरू होती. तसेच या तिघांची अधिक चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांची कोठडी मागितली होती. यानंतर न्यायालयाने एक दिवसांची रिमांड वाढवून दिली होती.

काय आहे प्रकरण?

टूलकिट हे राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती. या आरोपावरून दिल्ली पोलीसांनी 22 वर्षीय दिशा रवीला बंगळुरूमधून 14 फेब्रुवारीला अटक करून तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात दिशा रवीला शुक्रवारी दिलेली तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपणार होती. म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी आणखी एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. दिशा रवीने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्गला टूलकिट पाठवलं व ते ग्रेटाने शेअर करावे, यासाठी प्रयत्न केले असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या