जागतिक किर्तीच्या डॉक्टरला कळाले बायकोचे ‘डर्टी सिक्रेट’, सौंदर्यवतीशी घेणार काडीमोड

अमेरिकेतील जगप्रसिद्ध सर्जन असलेले डॉ. हान जो किम यांनी 2015 साली मिस अमेरिका असलेल्या रेजिना टर्नर हिच्यासोबत विवाह केला होता. गेली सहा वर्ष त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र किम यांच्या घरातील कॉम्प्युटरवर एक मेसेज आला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.

किम यांची पत्नी रेजिनासाठी तो मसेज होता व त्या मेसेजवरून रेजिनाचे नको ते धंदे समोर आले आहेत. रेजिना ही किम यांच्यापासून लपवून कॉलगर्ल म्हणून काम करत होती. ती श्रीमंत लोकांकडून एका रात्रीसाठी लाखो रुपये कमवायची. तिच्या एका कस्टमरनेच तिला तो मेसेज पाठवला होता. तो मेसेज वाचून किम यांना धक्काच बसला व त्यानंतर त्यांनी रेजिनासोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. किम यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

किमने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहेत की रेजिनाने आतापर्यंत तिच्या कस्टमरकडून सात लाख डॉलर इतके पैसे कमावले आहेत. रेजिनाचे सर्व कस्टमर हे न्यू जर्सीमधील मोठे मोठे रिअल इस्टेटचे व्यावसायिक तसेच डिझायनर होते. मात्र रेजिनाने या त्यांच्या दाव्याला फेटाळून लावत तिच्या आजीने तिला पाच लाख डॉलर्सची मदत केली होती असे सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या