दिवसभरात 10 कि.मी.चा प्रवास करणारे कासव

71

सामना ऑनलाईन, लंडन

आपले प्रेम मिळावे म्हणून प्रियकर, प्रेयसी कोणत्याही दिव्यातून जायला तयार असतात. अगदी सात समुद्र पार करून जाण्याचीही त्यांची तयारी असते. असंच काहीसं धाडस एका कासवाने दाखवले. विश्वास बसत नाही ना… मग ऐकाच कासवाची गोष्ट. इंग्लंडमध्ये एका मिस स्टेन्शन यांनी कासव पाळले आहे. फ्रेडी असे त्याचे नाव आहे. फ्रेडीची प्रेयसी म्हणजे मादी कासव प्राणिसंग्रहालयात आहे. तिला भेटण्यासाठी फ्रेडी १० किलोमीटरचा प्रवास
दिवसभरात पार करून गेला म्हणे…अत्यंत कमी वेगाने चालणारा कासव दहा किलोमीटर दूर गेलाच कसा हे फ्रेडीच्या मालकिणीसाठी न सुटणारे कोडे आहे. घरात कुणी नाही हे बघून फ्रेडी बाहेर पडला. मालकिणीने दिवसभर शोधाशोध केली. अखेर तो प्राणिसंग्रहालयात सापडला. गेल्या ५० वर्षांपासून हे कासव मिस स्टेन्शन यांच्या घरी राहते.

आपली प्रतिक्रिया द्या