नेरूर विभागात आमदार वैभव नाईक यांचे जनसंवाद अभियान उत्साहात

693

कुडाळ तालुका कृषी क्षेत्रात अग्रेसर असून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत व माझ्या  माधमातून कुडाळ तालुक्यात राबविले जात आहे.  एसआरए पद्धतीने भात  लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे. यामुळे दीडपट  भाताचे उत्पन्न वाढले आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने हे भात खरेदी करून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून द्यावा ही आमची आग्रही मागणी शासनाकडे होती. शेतकऱ्यांकडील भाताला व्यापारी १४०० रुपये दर देत आहेत. मात्र आज शासनाकडून २२०० रु क्विंटलने भात खरेदी केली जात आहे. आपल्या जिल्हयातील  सुमारे ५ कोटी ५० लाखाचे भात  शासनाने खरेदी केले आहे.त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढीच शेती न करता. भाताची विक्री करण्याच्या दृष्टीने शेती करण्यासाठी शेतकऱयांना आम्ही  प्रोत्साहन देत आहोत.असे प्रतिपादन कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केले.

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे  आमदार वैभव नाईक यांचे  जनसंवाद अभियान नेरूर विभागात आज शनिवारी संपन्न झाले. सरंबळ नेरूर वालावल चेंदवण, कवटी, हुमरमळा वालावल या गावातील लोकांचे प्रश्न समस्या जाणून घेत आमदार वैभव नाईक यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला.  नेरूर विभागातही या जनसंवाद अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  लाभला.निसंकोचपणे अनेकांनी  आपल्या अडीअडचणी आमदारांसमोर मांडल्या आमदार वैभव नाईक यांनीही त्याच  तत्परते या शंकांचे निरसन केले. ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करत अभियानाचे कौतुक केले.

आमदार वैभव नाईक ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले, ग्रामस्थांमध्ये नेहमी प्रश्न असतो तो म्हणजे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनीधीने आपल्या गावात वाडीत काय विकास केला? याच प्रश्नाचे समर्पक उत्तर घेउन अभियानाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. आम्ही पाच वर्षात केलेली कामे तुमच्या समोर मांडत आहोत. प्रत्येक गावातील , लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, सरपंच यांनी सुचविलेले प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. काम करणाऱ्या व्यक्तीला सर्वानी सहकार्य केले पाहिजे, आपापसातील मतभेद विकास कामाच्या आड येत कामा नये, तसे झाल्यास विकास कामासाठी जे लोक मेहनत घेतात त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने सर्वांनी  एकत्र  यावे असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले,कुडाळ तालुक्यात मागेल त्याला पॉवर टिलर उपलब्ध करून दिला जात आहे. शेती करण्यासाठी माणसे मिळत नसल्याने शेतकरी शेतीपासून दूर जात आहेत. त्या सर्वांना पुन्हा शेतीकडे वाळविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण हि योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. माणगाव खोऱ्यात यावर्षी  भात  लावणी यंत्र दिले. पुढील वर्षी नेरूर विभागातही हे यंत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांना भात लावणी वेळी त्रास होउ नये यासाठी हे यंत्र असून यंत्राच्या माध्यमातून शेती लवकरात लवकर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे  शेतकऱयांना मिरीलागवड, हळद लागवड, यासाठीही अनुदान दिले जात आहे.

महिला बचतगटांमधील ६७०० महिलांना प्रत्येकी  १२ हजार रुपये कुक्कुट पालनासाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून हि योजना सुरु होतेय. कुडाळ मध्ये सुसज्ज क्रीडांगण , बसस्थानक, मच्छिद्र कांबळी नाट्यगृह, महिला रुग्णालय, महत्वाची पुले, साकव , जिल्हा मार्ग,  राज्य मार्ग आज सुस्थितीत करण्यात आले आहेत. लोकांच्या अडीअडचणी आम्ही सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मतदार संघातील सर्व शाळा डिजिटल केल्या जात आहेत. सर्व शाळांची दुरुस्तीची कामे सुरु आहेत. ज्या शाळेत आपले विध्यार्थी शिक्षण घेतात ती शाळा सर्व सोयी सुविधा युक्त असावी, शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना त्रास होता नये, या दृष्टीने शाळांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.हि विकासाची गंगा यापुढेही अशीच सूरु राहणार आहे.  मागील निवडणुकीत ज्याप्रमाणे आपण सर्वांनी  आमच्यावर विश्वास दाखवला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढील काळातही लाभेल असा आशावाद आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

यावेळी संपर्क प्रमुख सुचिता चिंदरकर  महिला जिल्हाप्रमुख  जान्हवी सावंत, उपसभापती श्रेया परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे,नगरसेवक सचिन काळप, नितीन सावंत,  विभागप्रमुख शेखर गावडे, नेरूर साईमंदिर येथे व्यवस्थापक राजन माडये, उपसरपंच समद मुजावर, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा म्हाडदळकर, दीपश्री नेरुरकर, रोहिदास म्हादळकर, श्यामसुंदर म्हादळकर, बाळा पावसकर, शेखर गवंडे, नेरूर मानकादेवी येथे हेमंत नेरुरकर, अरुण चव्हाण, ग्रा.पं  सदस्य राजन पावसकर, प्रसाद गावडे, माधवी गावडे, तंटा मुक्ती अध्यक्ष भास्कर गावडे, सुनील गावडे, विनय गावडे, शेखर मुळम, सरंबळ येथे मनाली साटम, उपसरपंच समीक्षा तोंडवलकर,  शाम परब, ग्रा. प. सदस्य नंदिनी परब, सौ दांडकर, माजी सरपंच प्रभाकर कदम, सुरेश परब, लक्ष्मण हळदणकर, नेरूर चव्हाटा येथे हेमंत नेरुरकर, रेश्मा हडकर, मंजुनाथ फडके, रुपेश सावंत, विजय लाड, भक्ती घाडी, वालावल येथील पं. स प्राजक्ता प्रभू, दिनेश गोरे, सिद्धेश मुननकार, प्रतीक मुननकर, रवी साळे, सदानंद हिंदळेकर, चेंदवण येथे सरपंच उत्तरा धुरी, उपसरपंच दीपक भरडकर, प्रशांत तेंडुलकर, सुभाष म्हाकले, नारायण तोरसकर, सगुण तोरसकर, नंदकिशोर केळुसकर, समीर मसुरकर, ग्रा प सदस्य रेवती तोरसकर, दर्शन मसुरकर, वालावल येथे सरपंच अर्चना बगे, ग्रा प सदस्य अमृत देसाई,  कांता माडये, रमा गाळणकर, सोनाली मांजरेकर, गिरीजा मुंजकर, मितेश वालावलकर, शिल्पा मयेकर, स्नेहल सामंत, शाखा प्रमुख रमेश परब, वीरेंद्र सामंत, संदेश यादव,अमित सावंत आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या