ऑस्ट्रेलियातील अनवट वाटा शोधा

2

सामना ऑनलाईन । मुंबई

देशाविदेशांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना तेथील महत्त्वाची पर्यटन स्थळे दाखवली जातात. त्यामुळे तेथील कानाकोपऱ्यातील अनवट वाटा या पर्यटकांपासून तशा लांबच राहतात. त्यामुळे देशाविदेशातील नागरिकांना ऑस्ट्रेलियातील अनवट ठिकाणं देखील दाखविण्यासाठी ऑस्ट्रेलियाने ‘अनडिस्कव्हर ऑस्ट्रेलिया’ ही मोहीम राबविली आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिनीती चोप्रा ही ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.

ऑस्ट्रेलियातील फार धुंडाळलेल्या न गेलेल्या पर्यटन स्थळांवर देखील पर्यटकांना घेऊन जाणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. यात पर्यटकांसोबत काही सुप्रसिद्ध व्यक्ती देखील असणार आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि जानेवारी ते एप्रिल या दोन टप्प्यांमध्ये या टुर जाणार आहेत. या टुर्सची अधिक माहिती मिळविण्यासाठी australia.com/undiscover इथे मिळू शकते.
संपर्क – 02266280203