पर्यटन हा करीयरसाठी उत्तम पर्याय ठरू लागलाय

72

अनेकजण वर्षातून किमान एक किंवा दोनदा हमखास पर्यटनाला निघतात. त्यामुळे पर्यटन व्यवसाय हळूहळू चांगला वाढणार आहे हे सरळ आहे. २०२५पर्यंत तर या करीयरमध्ये नोकऱयांच्या ४६ दशलक्ष संधी उपलब्ध होणार आहेत अशी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे अशी पात्रता असेल तर यामध्ये करीयर करायला हरकत नाही. हिंदुस्थान देश हा बहुतांश नैसर्गिक साजसृंगाराने नटलेला आहे. त्यामुळे येथे फिरण्यासारखी असंख्य ठिकाणे आहेत. त्यामुळे सरकारने पर्यटनामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बारावीनंतर विद्यार्थ्यांनी पर्यटनाकडे वळायला हरकत नाही. ट्रव्हल एजन्सीजमध्ये जॉब करण्यासाठीही चांगली संधी उपलब्ध आहे. या करीयरमध्ये प्रशिक्षित झालेल्या तरुणांना आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती विमानतळांवर, मोठ्य़ा पगाराची नोकरी मिळू शकते. शिवाय ट्रान्सपोर्ट ऑफिसर, हॉलिडेज कंसल्टंट, लॉजिस्टीक्स, क्रुजेस, एअरलाइन्स, हॉटेल्स आणि टुरिझम डिपार्टमेंटमध्येही चांगला जॉब करता येतो.

ट्रव्हल करीयरची वैशिष्ट्य़े
– यातून देशाला परकीय चलन भरपूर मिळू शकते. या व्यवसायाशी असंख्य लोक संबंधित आहेत.
– या क्षेत्रात असाल तर प्रवासाला निघणाऱया कोणत्याही व्यक्तीला तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करू शकाल.
– इतिहास, भूगोल, कला आणि आर्किटेक्चर या विषयांत आवड असलेल्यांना या क्षेत्रात यश मिळू शकेल.

पात्रता
प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर अनुभव हा हवाच. पण त्याआधी त्या त्या क्षेत्राचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहेच. अनेक महाविद्यालये, विद्यापीठे आणि खासगी संस्थांमध्ये बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री कोर्समध्ये ट्रव्हल ऍण्ड टुरिझम हा कोर्स असतो. काही संस्थांमध्ये डिप्लोमो कोर्सही आहे. अलिकडे वाढत्या मागणीनुसार ऑनलाईन कोर्सही सुरू करण्यात आले आहेत. कोणत्याही माध्यमातून बारावी उत्तीर्ण झालेल्यांना या डिग्री वा डिप्लोमोसाठी प्रवेश घेता येतो. पण शक्यतो पदवीधर झाल्यानंतर या क्षेत्रात करीयर करण्यासाठी कोर्स करणं जास्त योग्य ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या