
मेहकर येथील समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. एका खासगी ट्रॅव्हल्सने अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघातात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी १५ जण गंभीर, तर १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील काही जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोमवार, ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरजवळ हा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स बस (एम. एच. ३१ एफसी ७४६८) प्रवाशांना घेऊन पुणे येथून नागपूरच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने समोरील एका अज्ञात ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. यासंदर्भात माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्र फर्दापूरचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद तिरणकर यांच्यासह पोलीस कर्मचारी व दीड तासानंतर बसमधून सुटका
अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे दबला गेला. त्यामुळे काही प्रवासी सुमारे एक ते दीड तास बसमध्येच अडकून पडले होते. सगळेच भयभीत झाले होते. आक्रोश सुरू होता. स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. पोलिसांनी स्थानिकाच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली.
मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोलीस कर्मचारी अवघ्या ८ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले व तातडीने ‘१०८’ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समृद्धी महामार्गावर नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीर उभ्या केलेल्या आयशर ट्रकला इर्टिगा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कृष्णा संगीत राठोड या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, कारमधील इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. रविवार मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील आंध्रड शिवारात, चॅनल जवळ हा अपघात घडला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हेमंत चव्हाण यांचे नातेवाईक सुझुकी कंपनीच्या अर्टिगा कारने समृद्धी महामार्गावरून जात असताना आंध्रड शिवारात चॅनलजवळ आयशर ट्रकचालकाने महामार्गावर पार्किंगला परवानगी नसतानाही वाहन रस्त्यावर उभे केले होते. मात्र काळोखामुळे रस्त्यावरील उभा ट्रक न दिसल्याने अर्टिगा कार पाठीमागून आयशरवर प्रचंड वेगाने धडकली. य भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. यामध्ये कृष्णा राठोड यांचा मृत्यू झाला, तर इतर नातेवाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

























































