हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंचा कस लागणार…

 

कोरोनामुळे बॅडमिंटन या खेळावरही परिणाम झाला. तब्बल दहा महिन्यांनंतर हिंदुस्थानी खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले. मात्र योनेक्स थायलंड ओपनमध्ये हिंदुस्थानच्या बॅडमिंटनपटूंना दुसरी फेरीही ओलांडता आली नाही. फिटनेसचीही समस्या प्रकर्षाने दिसून आली. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या टोयेटा थायलंड ओपनमध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानी बॅडमिंटनपटूंचा कस लागणार आहे. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासह इतर बॅडमिंटनपटूंना ऑलिम्पिकआधी होणाऱ्या स्पर्धांमध्ये प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या