रेल्वे रुळाला तडे; ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । ठाणे

ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने ठाणे-ऐरोली दरम्यान वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून ही परिस्थिती संध्याकाळपर्यंत अशीच राहिल्यास कामावरून घरी परताना मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.