दिंडोरीत ट्रॅक्टरसह विहिरीत बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

13

सामना ऑनलाईन, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारे शिवारात ट्रॅक्टर मागे घेत असताना विहिरीत पडल्याने ३२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल वीस तासांच्या प्रयत्नांनंतर आज मृतदेह बाहेर काढण्यात आला.

पिंपळनारे शिवारात राहणारे विवेक अरविंद ठाकरे हे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुदाम शिंदे यांच्या विहिरीजवळ ट्रॅक्टर मागे घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी विहिरीचा कठडा तुटला व ठाकरे ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळले. ही विहीर ८० फूट खोल असून, त्यात भरपूर पाणी होते. याबाबत कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले, मात्र पाणी जास्त असल्याने मदतकार्यात अडचणी येत होत्या. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रथम ट्रक्टर व नंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी हवालदार नंदू वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या