घोडबंदर रस्त्यावर अपघात, वाहतूक विस्कळीत

599

सामना ऑनलाईन । ठाणे

मिरा भायंदर रोडजवळ ऑईल सांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, रस्त्यावरील आईल साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

घोडबंदर रस्त्यावर स्कॉडा रॅपीड कार पलटी झाल्याने अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये स्कॉडा गाडीतील पती-पत्नी जखमी झाले असून, त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या