गणपती विसर्जनानिमित्त मुंबईत अनेक वाहतूक मार्गांवर बदल

प्रतिकात्मक छायाचित्र

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईत रविवारी सार्वजनिक आणि घरगुती गणेशाचं विसर्जन केलं जाणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक मार्गावरील वाहतूकीत बदल केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी रविवारी संपूर्ण मुंबईतील 53 रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवले आहेत. तर 56 रस्त्यावर एका दिशेनेच वाहतूक सुरु ठेवली जाणार आहे. तसेच काही मार्गांना पर्यायी मार्गही वाहतूकीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुंबईतील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी जवळपास तीन हजार वाहतूक पोलीस, स्वयंसेवक तैनात असतील. वाहतूक पोलिसांनी विशेषकरून दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरातील मार्गांवर बदल केले आहेत.