‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांचे पेशावरमधील घर कोसळले

दिलीप कुमार - मोहम्मत युसुफ खान

सामना ऑनलाईन । पेशावर

रूपेरी पडद्यावरील ट्रॅजेडी किंग अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे पेशावरमधील पूर्वजांचे घर दोन दिवसांपूर्वी कोसळले आहे. या घरामध्ये दिलीपकुमार यांचा जन्म झाला होता. पेशावरमधील क्विसीखावनी बाजाराजवळ दिलीप कुमार यांच्या पूर्वजांचे घर आहे.

२०१३ मध्ये पाकिस्तान सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून जाहीर केले होते. हे घर मोडकळीस आल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी सरकारला दिली होती. ही इमारत वाचविण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याचे आवाहनही पाकिस्तानातील दिलीपकुमारच्या चाहत्यांनी केले होते. दिलीप यांनी १९८८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी या घरालाही भेट दिली होती. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वात आधी तिथल्या जमिनीला नमन केले होते.