ट्रायची नवी योजना, 2 पैसे प्रति एमबी दराने जलद वाय फाय

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली –

देशवासीयांना कमी पैशात जलद वाय फाय सेवा पुरविण्याची एक नवी योजना लवकरच येत आहे. लघु उदयोजक, विविध गट आणि मोबाईल सेवा पुरविणाऱ्या प्रोवाइडर्सच्या मदतीने २ पैसे प्रति एमबी दराने जलद वाय फाय सेवा पुरविण्याची ट्रायची योजना आहे.

टेलिकॉम नेटवर्क्स शिवाय देशभरातील काना कोपऱ्यात वाय फायच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरविण्याचा ट्रायचा मानस आहे. टेलिकॉम नेटवर्कवरून सध्या १० पैसे प्रति एमबी दराने जलद वाय फाय सेवा पुरविली जात आहे. त्या ऐवजी २ पैसे प्रति एमबी दराने जलद वाय फाय सेवा पुरविण्यात येणार आहे. याचाच अर्थ २० रूपये ४८ पैशात १ जीबी डेटा ग्राहकांना देता येऊ शकतो. ही योजना अस्तित्वात आल्यास टेलिकॉम कंपनीवरील इंटरनेट सेवा पुरविण्याचा भार कमी होईल आणि ते उत्तम प्रतीची कॉल सेवा देऊ शकतील.

ट्रायची वाय फाय सेवा बंधनमुक्त करण्याची योजना लवकरच टेलिकॉम मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित लायसन्स, नियम व कायद्यांमध्ये बदल करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना देशभरातील काना कोपऱ्यात जेथे जेथे टेलीकॉम कंपन्या पोहोचल्या नाहीत तेथे वाय फायच्या माध्यमातून इंटरनेट सेवा उपलब्ध होईल.

आपली प्रतिक्रिया द्या