Video- अॅसिड हल्ल्यामागची विकृती आणि वेदना मांडणारा ‘छपाक’चा ट्रेलर

839

देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये अॅसिड हल्ल्याचीही गणना होते. अशाच एका अॅसिड हल्ल्याच्या वेदना सहन करून पुन्हा जिद्दीने उभ्या राहिलेल्या लक्ष्मी अगरवालची कथा सांगणारा छपाक या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

छपाक या चित्रपटाचं पोस्टर काही काळापूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण अॅसिड हल्ल्याच्या पीडितेच्या भूमिकेत दिसत होती. तिच्या या लूकची चाहत्यांनी प्रशंसा केली होती. आता या ट्रेलरमध्येही दीपिकाने आपल्या अभिनयाची कमाल दाखवल्याचं दिसून येत आहे. तलवार आणि राझीसारखे हटके चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

या चित्रपटाची कथा लक्ष्मी अगरवाल हिच्या आयुष्यावर बेतली आहे. दीपिकासोबत या चित्रपटात विक्रांत मेस्सी हा अभिनेताही झळकणार आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2020रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या