सिद्धार्थ मल्होत्रा झाला ‘जेंटलमॅन’

51

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या आगामी जेंटलमॅन या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बी सुंदर, बी सुशील, बी रिस्की.. अशी कॅचलाईन असलेल्या या ट्रेलरने आतापर्यंत काही लाखांचे लाईक्स मिळवले आहेत. गौरव आणि ऋषी अशा दुहेरी भूमिकेत सिद्धार्थ दिसणार असून त्याच्या जोडीला जॅकलिन फर्नांडिसही त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

एकीकडे साधाभोळा गौरव तर दुसरीकडे बदमाश ऋषी.. अशा दोन्ही भूमिकेत दिसणारा सिद्धार्थ या चित्रपटात चांगलीच मारधाड करताना दिसत आहे. राज आणि डीके दिग्दर्शित जेंटलमॅन येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या