Palghar accident : हायड्रोजन गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक पलटी; मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्यावर हायड्रोन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक पलटी झाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हायड्रोजन गॅस हा ज्वलनशील असल्याने सिलेंडर रस्त्यावर आपटतक्षणी आग लागली.

हायड्रोजन गॅस सिलिंडरची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्याचा मारा तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पहाटे दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प होती अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

गुजरातहून मुंबईकडे हायड्रोजन गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रक ट्रेलर वसई-तुंगारेश्वर फाट्याजवळ पलटी झाला. हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ असल्याने अपघातानंतर आग लागली. काही सिलिंडरचा स्फोटही झाला, अशी माहिती वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी भूपेश भोईर यांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासात आग आटोक्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.