
करंजाडे ते उरण दरम्यान रेल्वे मार्गावर पेट्रोलची पाईपलाईन फुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे सेवा स्थगित केल्याने उरण मार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. या मार्गावरील सर्व रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
बुधवारी सकाळी 11.42 वाजता ही घटना घडली. यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव उरण ते खारकोपर दरम्यान रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत या मार्गावरील सर्व स्थानिक गाड्यांची सेवा थांबवण्यात आली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे.



























































