जम्मू-कश्मीर: त्रालमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

12
jawans
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या पुलवामामधील त्राल भागात हिंदुस्थानचे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. सुमारे दोन तासांपासून चकमक सुरू असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

त्रालमध्ये 42 राष्ट्रीय रायफलच्या जवानांची एक तुकडी गस्तीवर होते. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती त्यांच्या हाती लागली होती. त्यानंतर संपूर्ण भागाला घेराव घालून शोध मोहीम सुरू होती. त्याचवेळी दहशतवाद्यांनी या तुकडीवर गोळीबार केला. जवानांनी त्याला चोख उत्तर दिले. चकमक सुरू असल्याची माहितीमिळताच ज्यादा कुमक घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. सीआरपीएफच्या 180 बटालीयनची ही तुकडी असून ते राष्ट्रीय रायफलच्या जवानांसोबत संयुक्त मोहीम राबवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या