जम्मू कश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर शाम सोफीचा खात्मा; त्रालमध्ये शोधमोहीम सुरू

indian-army-jawan-in-jk

जम्मू कश्मीरच्या अवंतीपोराच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाने चकमकीत जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर शाम सोफीचा खात्मा केला आहे. सुरक्षा दलाकडून त्रालमध्ये शोधमोहीम राबवण्यात येत आहे. लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. सुरक्षा दलाचे हे मोठे यश आहे.

त्रालमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तिलवानी भागात पोहचल्यावर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबाराला सुरुवात केली. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत शाम सोफीचा खात्मा केला.

सुरक्षा दलाने नुकतीच सोफीयामध्ये कारवाई करत दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्यांमध्ये गांदरबल येथील मुख्तार अहमद शाह रेवडी हा विरेंद्र पासवान यांच्या हत्येत सहभागी होता. फेरीफोरामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरदाखल सुरक्षा दलाने कारवाई करत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

आपली प्रतिक्रिया द्या