27 वर्षांच्या सेवेत 53 वी बदली; अशोक खेमका यांना प्रामाणिकतेचे फळ

604

हरयाणामधील आयएएस अधिकारी अशोक खेमका यांना प्रामाणिक सेवेचा चांगला मोबदला हरयाणा सरकारने दिला आहे. सरकारने खेमका यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. 27 वर्षांच्या सेवेत खेमका यांची ही 53 वी बदली ठरली आहे.

1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी खेमका यांची आता अभिलेखा, पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे. याआधी मार्चमध्ये खेमका यांची बदली विज्ञान आणि औद्योगिक विभागाच्या प्रधान सचिवपदी झाली होती. सेवेतील 53 व्या बदलीनंतर खेमका यांनी आपल्यावरील अन्यायाला ट्विटरवर वाचा फोडली. ‘पुन्हा बदली… वळून पुन्हा तिथेच’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

गुरूग्राममध्ये सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमिनीशी संबंधित व्यवहाराची चौकशी करण्याचे काम खेमका करीत होते. तेव्हापासून ते चर्चेत आले. खेमका ज्या विभागात जातात तेथील घोटाळे, गैरव्यवहार उघडकीस आणतात. त्यानंतर त्यांची बदली होते. भूपिंदरसिंह हुड्डा यांच्या कार्यकाळातही त्यांनी अनेक घोटाळे उघड केले आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये तत्कालीन हुड्डा सरकारने रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ जमीन घोटाळा उघडकीस आल्यानंतर खेमका यांची बदली परिवहन विभागात करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या