राज्यातील पोलीस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश आज जारी करण्यात आले. दहाहून अधिक उपायुक्तांच्या बदल्या व नियुक्तीबरोबर परीविक्षाधीन आयपीएस अधिकाऱयांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत.
बदली व नियुक्त्या झालेल्या अधिकाऱयांमध्ये सुधाकर पठारे (उपायुक्त-बृहन्मुंबई), संदिप सिंह गिल (अधीक्षक-पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (उपायुक्त-बृहन्मुंबई), तेजस्वी सातपुते (उपायुक्त-पुणे शहर), राजतिलक रोशन (सहाय्यक महानिरीक्षक- कायदा व सुव्यवस्था), निमित गोयल (उपायुक्त-बृहन्मुंबई), विजय चव्हाण (प्राचार्य- सोलापूर पोलीस प्रशिक्षण पेंद्र), लोहित मतानी (उपायुक्त-नागपूर शहर), लक्ष्मीकांत पाटील (अधीक्षक- महाराष्ट्र सायबर सुरक्षा), रोहिदास पवार (अपर अधीक्षक-लोहमार्ग पुणे), सुशांत सिंह (समादेशक-नागपूर पॅम्प), अभयसिंह देशमुख (अधीक्षक-शस्त्र निरीक्षण शाखा), गोपुल राज जी (समादेशक-नवी मुंबई), आशित कांबळे (अपर अधीक्षक-नंदुरबार), महक स्वामी (उपायुक्त-नागपूर शहर), निथीपुडी रश्मिता राव (उपायुक्त-नागपूर शहर), पंकज अतुलकर (समादेशक-सोलापूर), सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी (अपर अधीक्षक-गडचिरोली). तसेच समीर शेख यांची उपायुक्त-बृहन्मुंबई अशी करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय परीविक्षाधीन आयपीएस अधिकाऱयांच्या उपविभागीय अधिकारी म्हणून केलेल्या नियुक्त्या – दीपक अग्रवाल (नागपूर ग्रामीण), दुगड दर्शन प्रकाशचंद (नंदुरबार), हर्षवर्धन बी. जे. (यवतमाळ), जीवन बेनीवाल (परभणी), नवदीप अग्रवाल (वाशीम), शुभम पुमार (अमरावती), विमला एम. (सांगली), वृष्टी जैन (नागपूर).