तृतीयपंथीय विद्यार्थिनी झाली रुईयाची ‘रोझ क्वीन’

186

सामना ऑनलाईन । मुंबई

महाविद्यालयांमध्ये साजरा होणाऱ्या अनेक डेजमधला एक लोकप्रिय डे म्हणजे ‘रोझ डे’. आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी ज्या व्यक्तीला सर्वाधिक गुलाबं मिळतील आणि ती व्यक्ती त्या वर्षीची कॉलेजची ‘रोज किंग’ किंवा ‘क्वीन’ बनते. मात्र, यंदा महाविद्यालय जगतात एक ऐतिहासिक ‘रोझ डे’ साजरा झाला आहे. कारण, एका तृतीयपंथीय विद्यार्थिनीला कॉलेजची ‘रोझ क्वीन’ होण्याचा मान मिळाला आहे.

अंजली सिरोया असं या २० वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात मास मीडियाचं शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी रुईयाच्या रोझ डेला तिला ‘रोझ क्वीन’ घोषित करण्यात आलं. वयाच्या १८ वर्षापर्यंत अंजली एका मुलाप्रमाणे मोठी झाली होती. त्यामुळे ती अजय असं नाव लावत होती. त्यानंतर तिने आईवडिलांना तिच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेची कल्पना दिली. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. पण, आपल्या आईवडिलांनी आपल्याला आनंदाने स्वीकारल्याचं अंजलीचं म्हणणं आहे.

रुईया महाविद्यालयात रोझ किंग आणि क्वीनसाठी एक स्पर्धा घेतली जाते. जेव्हा रोझ क्वीन स्पर्धेबद्दल अंजलीने ऐकलं तेव्हा तिला आपण या स्पर्धेत भाग घेऊ शकतो का, याबद्दल साशंकता होती. मात्र, रुईया महाविद्यालयाची भूमिका सकारात्मक असल्याने तिने स्पर्धेत सहभागी होण्याचं निश्चित केलं. दुसरीकडे रुईयाच्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, अंजली या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आम्ही खूप उत्साही होतो. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही अंजलीच्या सहभागाला पाठिंबा दिला होता, हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं वाघमारे यांचं म्हणणं आहे.

summary- transgender became rose queen of ruia college

आपली प्रतिक्रिया द्या