
एका ट्रान्सजेंडर पुरुषाने दोन महिला आणि एका किशोरवयीन मुलीसोबत बनावट लिंगाद्वारे लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही घटना लंडनमध्ये घडली आहे. तरजीत सिंग (32) यांचा जन्म मुलगी म्हणून झाला होता. तिचे बालपणीचे नाव हॅना वॉल्टर्स होते. पण आता ती मुलगी पुरुष म्हणून ओळखला जातो. सिंग यांच्यावर सेक्स करताना नकली लिंगाचा वापर केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. न्यायायलायात या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एका पीडित महिलेने सांगितले की, या घटनेमुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.
लंडनच्या स्नेरेस्ब्रुक क्राउन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. सिंग हे रिलेशनशिप दरम्यान हल्ल्याच्या तीन गुन्ह्यांमध्ये, शारीरिक इजा करण्याच्या सहा गुन्ह्यांमध्ये आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या एका गुन्ह्यात दोषी आढळले होते. सिंगने पीडितेला पेटवून मारण्याची धमकी दिल्याचे या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, कोर्टाला समजले. तसेच त्याने मोबाईलने महिलेच्या नाकाला इजा केली होती.
न्यायाधीश ऑस्कर डेल फॅब्रो यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, सिंग हा एक धोकादायक गुन्हेगार आहे. ज्याने तीन महिलांवर वारंवार हल्ले केले आहेत. ते म्हणाले की, सिंह हे खोटे बोलण्यात माहिर आहेत आणि त्यांनी अनेक लोकांशी वारंवार खोटे बोलले आहे.