जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू पाटी येथे अपघातात दोघांचा मृत्यू, 3 जण जखमी

लातूरच्या जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू, पाटी यथे गुरुवारी रात्री 8:30 च्या सुमारास ट्रॅव्हलर आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. त्यात ट्रॅव्हलर मधील दोघांचा मृत्यू झाला असून इतर 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. तर यात 15 व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

किरकोळ जखमी व्यक्तींनी प्राथमिक आरोग्य केंद्र हाडोळती, वांजरवाडा येथे उपचार घेतले. त्यात गोविंद वामन सोनकांबळे (तिरुका, ता. जळकोट), संतोष भालेराव (व्होंडाला,मुखेड) हे उपचार घेत आहेत. तर लातूर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये माधव तुकाराम डुकरे (हाथरणी,अहमदपूर), बालाजी त्रंबक रेकडगेवर (मांडणी, अहमदपूर), मारोती बाबू इरबनवाड (मांडणी) हे उपचार घेत आहेत.

या अपघातात निवृत्ती गणपती नरवटे अंदाजे वय 58 वर्ष आणि पार्थवी विष्णुदास नरवटे अंदाजे वय 6 महिने या दोघांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही रा. कोळणुर ता. जळकोट येथील एकच कुटुंबातील सदस्य आहेत. अपघात स्थळी उमरगा रेतु, हाडोळती येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जखमी व्यक्ती यांना मदत केली.

हा अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी जळकोटचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम पोहचून रस्ता खुला करून दिला. तहसीलदार सुरेखा स्वामी आणि त्यांची टीम यांनी जखमी झालेले रुग्ण यांना हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भेट दिली. पालकमंत्री यांनी जखमींची चौकशी केली.