खासगी बस दरीत कोसळून ४ ठार, ३० जखमी

42

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर शेडगाव पाटीजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून, ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

समुद्रपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर खासगी ट्रॅव्हल्स बसने (बस क्र- एमएच ४९, जे ८५१६) दुचाकीला (क्र – एमएच ३२, एबी ४६५०) जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट दरीत कोसळ्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातमध्ये मोटारसायकलवरील दोघे आणि ट्रॅव्हल्समधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅव्हल्सच्या किन्नरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये अमोल धनराज बावणकर ( २५), धनराज बावणकर (६५), विनायक गणपतराव गौळकार (५५), बालू ऊर्फ नरहरी पुरुषोत्तम देशमुख (३२) यांचा समावेश आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून सध्या दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या