ट्रीहाऊसने अचानक नर्सरी बंद केल्यानं पालक-विद्यार्थी अडचणीत

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईक करा, ट्विट करा

th-for-new-site-1ट्रीहाऊस नर्सरीने देशभरातील ११३ शाखा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे या नर्सरीत शिकणाऱ्या लहानग्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर संकट निर्माण झालंय. शिक्षकांना द्यायला पगार नसल्याने आपण या शाखा बंद करत असल्याचा निर्णय या नर्सरीने अचानक पालकांना कळवला,त्यामुळे पालक भयंकर मोठ्या संकटात सापडले आहेत.

जेव्हा चिंताग्रस्त पालकांनी अंधेरीच्या मोरया हाऊसमधील नर्सरीत धाव घेतली तेव्हा अनेकांना तिथे टाळं लागलेलं दिसलं, ज्यामुळे ते अजूनच धास्तावले आहेत. या नर्सरीने बंद केलेल्या ११३ पैकी ३६ नर्सरी या एकट्या मुंबईमधल्या आहेत. यामुळे संतापलेल्या पालकांनी चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. th-for-new-site-2

नर्सरी बंद झाल्यानं विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबतच अडकलेल्या शुल्काचीही चिंता पालकांना सतावायला लागली आहे, कारण अनेक पालकांनी पुढच्या वर्षीचंही शुल्क आगाऊ भरलं आहे. नर्सरी अचानक बंद झाल्यानं आता विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश कसा मिळणार या भीतीनं पालकांच्या पोटात गोळा आलाय कारण प्रवेशासाठीची कागदपत्र ही देखील या नर्सरीकडेच आहे.