अजब आजार… माणसालाच फुटल्या फांद्या

65

सामना ऑनलाईन । ढाका

झाडाला पालवी फुटणे, फांद्या येणे हा निसर्ग नियमच पण माणसाला फांद्या फुटलेल्या पाहिल्यावर धक्काच बसला ना! बांगलादेशमधील अबुल बजनदार नावाच्या व्यक्तीला असा आजार झाला आहे की, त्याच्या हातावर एखाद्या झाडाला फांद्या फुटाव्या तशा फांद्या फुटल्या आहेत.

चार वर्षांपूर्वी अबुलला त्याच्या हाता-पायावर काही तरी उभरतयं असं जाणवलं. त्याने तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेतली. त्याच्या डॉक्टरांनी त्याला स्कीन स्पेशॅलिस्टकडे पाठवले. त्यानंतर सर्व विविध वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर अबुलला ‘एपिडर्मोडिस्प्लैगिया वेरुसिफॉ़र्मिस नावाचा आजार झाला असल्याचे समोर आले. हा एक प्रकारचा त्वचेचा आजार असून त्यामध्ये माणच्या ‘ऊती’ (टीशू) झाडांच्या फांद्याप्रमाणे वाढत जातात. म्हणून या आजाराला ‘ट्री मॅन डिजीज’ असेही नाव देण्यात आले आहे. अबुलच्या आजारावर उपचारासाठी म्हणून १६ शस्त्रक्रिया नुकत्याच करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांनंतर जर हा आजार बरा झाला तर अशा आजारावर मात करणारा तो पहिला रुग्ण ठरेल. या आजारामुळे माझं रोजचं जगणं कठीण झालं होतं, मुलांनाही मी खेळवू शकत नव्हतो. मात्र आता शस्त्रक्रियेनंतर तरी हा आजार बरा होईल, अशी आशा अबुलने व्यक्त केली आहे.

दरम्यान, या आजाराने पीडित तीन रुग्ण जगभरात आढळले आहेत. इंडोनेशियाच्या एका गावातील व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर अशा प्रकारे फांद्या उगवल्या होत्या. २००८ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या