श्रीरंग बारणेच्या प्रचार रॅलीला उरणमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

17

सामना प्रतिनिधी । उरण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मतदार संघातील गावोगावी विकासाची गंगा आणण्ययााचे कार्य केले आहे. त्या विकास कामांच्या जोरावर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रँलीला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय हा अटळ आहे.असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे.

२९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनेते रामशेठ ठाकूर,आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर आणि भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरण तालुक्यातील गावोगावी युतीच्या पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्यांच्या प्रचार रँलीचे आयोजन शनिवारी (दि.२०) करण्यात आले होते. या प्रचार रँलीची सुरूवात १९८४ सालच्या जासई लढ्यातील हुतात्म्याना आणि लोकनेते दि.बा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रचार रँलीला संबोधित करताना महेश बालदी हे बोलत होते.

या प्रचार रँलीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, कामगार नेते दिनेश पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, जितेंद्र घरत, समिर मढवी, ग्राहक कक्षाचे जिल्हा प्रमुख रमेश म्हात्रे, भाजपाचे दिपक भोईर, माजी सभापती भास्कर मोकल, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, निळकंठ घरत, मेघनाथ म्हात्रे, भाजपाचे युवा नेते महेश कडू, प्रशांत पाटील,भाजपाचे तालूका चिटणीस सुनिल पाटील, प्रदिप ठाकूर, तेजस पाटील,भाजपा महिला अध्यक्षा संपदा थळी, शिवसेना महिला संघटक ज्योती म्हात्रे, माजी उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड, विभाग प्रमुख कमळाकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, माजी सरपंच विलास पाटील, प्रसाद पाटील, तालूका संघटक बी. एन. डाकी, गणेश म्हात्रे उरण पंचायत समितीचे सदस्य दिपक ठाकूर, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, माजी सरपंच जे. पी. म्हात्रे, नारायण ठाकूर, माजी सरपंच जितेंद्र घरत, सरपंच बळीराम ठाकूर, तालूका उपाध्यक्ष जयवंत पाटील, शहरप्रमुख, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे तसेच गावोगावचे आजी माजी सरपंच, सदस्य आणि युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या प्रचार रँलीत सहभागी झालेल्या युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना गावोगावच्या सुहासिनी ओवाळणी करुन त्यांचे फटाक्यांच्या आणि ढोल ताशाच्या गजरात स्वागत करीत होते. यावेळी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या रँलीत एकदिलाने सहभागी झाल्याने विरोधाच्या पाया खालची वाळू सरकू लागली आहे. एकंदरीत उरण तालुक्यातील जनता जनार्दनाचा आशिर्वाद हा मोठ्या प्रमाणात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मिळत असल्याने मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेना-भाजपा युतीचा झेंडा फडकेल असा विश्वास शेवटी महेश बालदी यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या