ट्रेंडी सनग्लासेस

श्रेया मनीष

पूर्वी केवळ उच्चभ्रू लोकांच्या डोळ्यांपर्यंतच मर्यादित असलेले गॉगल्स आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले आहेत. याला तुम्ही फॅशनचा बदलता ट्रेण्डही म्हणू शकता.

रखरखत्या उन्हातून डोळ्यांना कूलकूल थंडावा देणारा एकमेव मार्ग म्हणजे गॉगल्स. केवळ फॅशनच नव्हे तर डोळ्यांच्या संरक्षणासाठीही गॉगल्सचा वापर उत्तम पर्याय आहे. कारण हे वापरल्यामुळे डोळे व त्याच्या आजूबाजूचा भाग झाकला जातो आणि ऊन व धूळ, मातीपासून डोळ्यांचे संरक्षण होते.

मात्र, अलीकडे गॉगल्सनाही तरुण पिढीने फॅशन ट्रेण्डमध्ये सामावून घेतलं आहे. केवळ उन्हाळ्यातच नाही तर बाराही महिने उन्हातून चालताना फॅशनेबल, स्टायलिश आणि अॅट्रक्टिव्ह लूक मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या स्टायलिश गॉगल्सचा वापर करू लागले आहेत. खरं तर अलीकडे मोठे फ्रेम असेले कलरफुल गॉगल्स नॅशनमध्ये इन आहेत आणि सगळेच अशा गॉगल्सचा वापर करीत आहेत. पण त्यातच तुम्ही जर तुमच्या चेहऱ्याच्या रचनेनुसार आणि तुमच्या रंगानुसार गॉगल्सचा वापर केला तर तुमच्या फॅशनेबल स्टाइलमध्ये आणखीच भर पडेल, नाही का? कसं…? पहा तर…

sunglasses

 लक्षात ठेवा

  • कोणताही गॉगल घेतेवेळी तो आपल्या डोळ्यांवर लावून ट्रायल करून पहा. तुम्हाला शोभून दिसत असेल तरच घ्या.
  • गॉगलला क्रॅचेस पडले असतील, चिरा पडल्या असतील किंवा ते फुटले असतील तर ते वापरू नका.
  • ब्लॅक, ब्राऊन, ग्रे, रेड, ग्रीन, ब्ल्यू, यलो किंवा प्लेन रंगाचे गॉगल्स दिसायला जरी आकर्षक असले तरी ते तुमच्या त्वचेला शोभून दिसणाऱ्या रंगाचीच निवड करा.
  • तुमच्या चेहऱ्यापेक्षा मोठा अगर चेहऱ्यापेक्षा लहान गॉगल वापरू नका. योग्य आकाराचाच गॉगल विकत घ्या.
  • एडिडास, रिबॉक, ओडी, फास्टट्रक, स्पेस, सिंगापुरी इ. ब्रॅण्डेड गॉगल्स विकत घेताना विचारपूर्वक घ्या.
  • स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे गॉगल्स विकत घेऊ नका. त्याने डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो.

गोल चेहरेपट्टी गोल चेहरेपट्टी असलेल्या लोकांना स्क्वेअर शेपचे गॉगल्स चांगले दिसतात. तसेच डबल चिन अगर जॉ लाइन वाढली नसेल तर राऊंड किंवा सेमीराऊंड शेपचे गॉगल्सही चांगले दिसतात.

चौरस चेहरेपट्टी चौरस म्हणजेच स्क्वेअर शेप असलेल्या लोकांना कर्व्ही फ्रेमचे गॉगल्स जास्त शोभून दिसतात. तसंच ओव्हल किंवा चौरस आकार घेतलेले वर्तुळाकार फ्रेम्सही चांगल्या दिसतात. बटरफ्लाय शेपच्या फ्रेम्सही चौरस चेहऱ्याला शोभून दिसतात.

अंडाकृती चेहरेपट्टी अंडाकृती चेहरेपट्टी असलेल्या लोकांना ब्रॉड स्क्वेअर, राऊंड, बटरफ्लाय… सर्व प्रकारचे गॉगल्स शोभून दिसतात.

डायमंड शेपची चेहरेपट्टी तुमची चेहरेपट्टी जर डायमंड शेप असेल तर तुम्ही हवा तो आणि हव्या त्या शेपचा गॉगल वापरू शकता.

 

आपली प्रतिक्रिया द्या