आयटीसी मराठाच्या वतीने आदिवासी कला, संस्कृती प्रदर्शन 

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ सोहळ्यात अंधेरी पूर्व येथील आयटीसी मराठा हॉटेलमध्ये समता फाऊंडेशनच्या सहकार्याने पालघरमधील आदिवासी कलाकारांची संस्कृती आणि कला याचे दर्शन घडवणारे तीन दिवसांचे खुले प्रदर्शन शनिवारपासून आयोजित केले आहे. प्रदर्शनात वारली कला, बांबू आणि कागदी लगद्याच्या कलाकृती पाहायला मिळणार असून कलाकार प्रत्यक्ष बनवताना दिसणार आहेत. पेशवे पॅव्हेलियन येथे पठारे प्रभूंच्या विविध पाककृती उपलब्ध असणार आहेत. संगीताचा विशेष कार्यक्रमही होणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत पाहता येणार आहे. संपर्क 022-28303030.