#ICCWorldCup क्रिकेट इतिहासात पहिल्या त्रिशतकीय भागिदारीचा मान हिंदुस्थानी जोडीला

सामना ऑनलाईन | मुंबई

एकदिवसीय क्रिकेट सुरू होऊन 28 आणि विश्वचषक स्पर्धा सुरू होऊन 24 वर्ष झाली होती आणि या दरम्यान हिंदुस्थानने 1 विश्वचषक देखील उंचावला. 1999 मध्ये हिंदुस्थानचा संघ मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळला. पहिले दोन सामने गमावल्याने हिंदुस्थानची सुरुवात वाईट झाली, त्यात झिम्बाब्वे सारख्या संघाने पराभव केल्याने सर्वत्र टीका झाली. परंतु त्यानंतर केनिया आणि श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करून हिंदुस्थानने सुपर सिक्स मध्ये प्रवेश केला. यात विशेष असे की वर्ल्डकप आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिली त्रिशतकीय भागिदारी करण्याचा मान टीम इंडियाला मिळाला.

1999 वर्ल्डकप मधील चौथ्या सामन्यात ‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 318 धावांची भागिदारी केली. यात गांगुलीचे योगदान होते 183 धावांचे आणि राहुल द्रविडचे योगदान होते 145 धावांचे. दोघांच्या या भागिदारीच्या बळावर हिंदुस्थानने 6 बाद 373 धावांचा डोंगर रचला आणि श्रीलंकेचा डाव 216 धावात बाद करून 157 धावांचा मोठा विजय मिळवला.

याच वर्षी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या जोडीने न्यूझीलँड विरुद्ध खेळताना द्रविड-गांगुलीचा विक्रम मोडीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक भागिदारीचा विक्रम केला. 8 नोव्हेंबर 1999 ला झालेल्या सामन्यात सचिन आणि द्रविड मध्ये दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 331 धावांची भागिदारी झाली. सचिनने 186 धावा कुटल्या, तर द्रविडने 153 धावांची खेळी केली. हा सामना हिंदुस्थानने 172 धावांनी जिंकला.

sachin-dravid

सध्या सर्वाधिक मोठ्या भागिदारीचा विक्रम विंडीजचा गेल आणि सॅम्युल यांच्या नावावर आहे. या जोडीने 2015 मध्ये  झिम्बाब्वे विरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 372 धावा जोडल्या होत्या, त्यांनंतर विंडीजच्या होप आणि कॅम्पबेल यांनी 2019 ला आयर्लंड विरुद्ध पहिल्या विकेटसाठी 365 धावा जोडल्या. यानंतर तिसऱ्या स्थानी सचिन आणि द्रविडचा नंबर, तर चौथ्या स्थानी द्रविड आणि गांगुलीचा नंबर आहे. परंतु पहिल्या दोन त्रिशतकी भागिदारीचा मान हिंदुस्थानला मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या