डायपर आणायला सांगितल्याने तलाक दिला, मुंबईतील धक्कादायक घटना

959
crime

नागपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने नवऱ्याविरोधात तक्रार दिली आहे. डायपर आणायला सांगितल्याचा राग आल्याने त्याने आपल्याला तलाक दिल्याचं या महिलेने म्हटलं आहे. बुधवारी हा प्रकार घडला असून या महिलेने म्हटलं आहे की जेव्हा तिने नवऱ्याला बाळासाठी डायपर आण म्हणून सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि तीन वेळा तलाक म्हणत तिला सोडचिठ्ठी दिली. या नवऱ्याविरोधात पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या नवऱ्याविरोधात बायकोला मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल आहे. नवऱ्याने न्यायालयात आपण बायकोची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र तरीही त्याने बायकोला त्रास देणं थांबवलं नव्हतं असं या घटनेवरून उघड झालं आहे. तलाकविरोधी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा हा दखलपात्र गुन्हा असून यामध्ये वॉरंटशिवाय पोलीस आरोपीला अटक करू शकतात. आरोपीला 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या