वाढदिवसाचं भयंकर गिफ्ट, व्हॉट्सअॅपवरून दिला ‘तलाक’

36
सामना ऑनलाईन । हैदराबाद
देशभरात सध्या तिहेरी तलाक आणि मुस्लिम महिलांच्या अधिकाराचा मुद्दा गाजत आहे. तिहेरी तलाक म्हणजे महिलांवर होणारा मोठा अत्याचार आहे. छोट्या छोट्या कारणांवरून, मनमानी पद्धतीने नवरे बायकांना तलाक देतायत. त्यात हैदराबादमधील एका प्रकरणाची भर पडली आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या एका नवऱ्याने त्याच्या बायकोला व्हॉटसअपवरून तलाक देऊन टाकला. या मेसेजच्या शेवटी नवऱ्याने या नवऱ्याने लिहलंय की ‘ले दे दिया तेरेको तेरा बर्थडे गिफ्ट’ असं लिहलंय जे अधिक धक्कादायक आहे. या पिडीत महिलेने हैदराबादच्या समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने तक्रारीत सांगितलं आहे की, औवैस तालिबसोबत २०१५ साली त्यांचा निकाह झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी २८ नोव्हेंबरला औवैसने तिला व्हॉट्सअॅपवर ‘तलाक तलाक तलाक’ मेसेज पाठवून निकाह मोडला.
पीडित महिला निकाह झाल्यानंतर आपल्या पतीसोबत महिनाभर दुबईला गेली होती. तेथून आल्यानंतर पतीने तिचा छळ करण्यास सुरूवात केली. तिला मोलकरणीसारखी वागणूक दिली जात असे, जेवणही दिले जात नसे. तसेच सासूने सासऱ्यांबरोबर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. सासऱ्यांसोबत शारीरिक संबध ठेवण्यास नकार दिल्यानंतर मला मारहाण करून एका खोलीत बंद केल्याचही या महिलेनं आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेला तिचे वडील माहेरी घेऊन आले. त्यानंतर पीडित महिलेने पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी तिच्या पतीने तिला व्हॉट्सअॅपवर ‘तलाक तलाक तलाक’ असा मेसेज पाठवून निकाह मोडला, अस पीडित महिलेने सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या