रमजानमध्ये अभिनेत्रीने स्विमसूट घातल्याने धर्मांधांचा संताप

14

सामना ऑनलाईन, मुंबई

दंगल चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री फातिमा सना शेख हीच्यावर धर्मांध सोशल नेटवर्कींग साईटवरून सध्या बरीच टीका करतायत. फातिमा ही सध्या सुट्टीवर असून तिने मालदीवमधल्या समुद्र किनाऱ्यावरील स्विमींग सूट परीधान केलेले फोटो  इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोला धर्मांधांनी रमजानशी जोडून तिच्यावर चिखलफेक करायला सुरूवात केली.

fatmia-comments

या धर्मांधांचा आक्षेप तिच्या कपड्यांवर नसून रमजानमध्ये हा फोटो शेअर करण्यावर आहे. या धर्मांधांनी तिच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करायला सुरूवात केल्यानंतर इतरांनी त्यांना चोख उत्तरं देत थंड केलं.

आपली प्रतिक्रिया द्या