किआराने केले टॉपलेस फोटोशूट, नेटकऱ्यांनी नेसवली साडी

प्रसिद्ध अभिनेत्री किआरा आडवाणी हिने फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांच्या कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी ती टॉपलेस झाली आहे. तिचा हा फोटो नेटकऱ्यांना आवडला नसून त्यांनी फोटोशॉपद्वारे तिला साडी नेसवली आहे.

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरमध्ये किआराच्या फोटोत ती टॉपलेस उभी असून शरीराचा काही भाग लपविण्यासाठी तिने मोठ्या पानाचा आधार घेतला आहे. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसत आहे. मात्र तिचा हा बोल्डनेस नेटकऱ्यांना आवडला नसून त्यांनी फोटोशॉप करून किआराला साडी, लेहेंगा, गाऊन असे वेगवेगळे कपडे घातले आहेत.


या कॅलेंडरमध्ये किआरासोबत भूमी पेडणेकर व सनी लिओनी यांनी देखील न्यूड फोटोशूट केले आहे. तर क्रिती सेनॉन, ऐश्वर्या राय, विद्या बालन, परिनीती चोप्रा या अभिनेत्रींचे देखील हॉट फोटो आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या