तुर्भे-वाशी दरम्यान ओव्हर हेड वायर तुटली, ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प

railway-tracks-mumbai-local

सामना ऑनलाईन । मुंबई

तुर्भे ते वाशी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन कामाच्या वेळी रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने स्थानकांवर गर्दी वाढत आहे. ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या