टीआरएसच्या नेत्याची माओवाद्यांकडून हत्या

42

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेले तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते नल्लुरी श्रीनिवास राव यांची माओवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यातील पुट्टापडू गावात सापडला.

45 वर्षीय नल्लुरी श्रीनिवास राव यांचे मध्यरात्री तेलंगणामधील भद्रद्री-कोठागुडेम जिल्ह्यातील कोथूर गावातून अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह छत्तीसगढमधील इरामपाडू या छोट्या गावात सापडला आहे. त्यांच्या डोक्यावर मारहाणीच्या खुणा आहेत. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या