मुंबई-पुणे महामार्गावर ट्रक पलटी, वाहतूक कोंडी

31

सामना ऑनलाईन । मुंबई

जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान लोखंडी पाईप घेऊन पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक रस्त्यावरच उलटला. यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक व पाईप हे रस्त्यावरच असल्याने पुण्याकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान उलटला. त्यामुळे त्यातील लोखंडी पाईप रस्त्यावर सर्वत्र पसरले आणि मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. दरम्यान, रस्त्यावर पडलेले पाईप आणि ट्रक बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या