PCOS – पीसीओएसच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर करा हे घरगुती उपाय

पीसीओएस (polycystic ovary syndrome), पीसीओडी (polycystic ovarian disease) यांसारखे आजार होणे ही हल्ली स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य समस्या आहे. हे एक प्रकारे स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल असंतुलन आहे. यामध्ये स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन एंड्रोजनचे संतुलन बिघडते. त्यामुळे मासिक पाळीत अडथळे येऊ लागतात. तसेच चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या दिसू लागते. केस गळायला लागतात आणि वजनही वाढू लागतं. या शिवाय याचा प्रजनन दरावरही परिणाम होतो. त्यामुळे स्त्रीला आई होणे कठीण होते. अशा परिस्थितीत, हार्मोनल आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

पीसाओेएसचे घरगुती उपाय-

सीड साइकलिंग करा

पीसीओएसपासून मुक्तता मिळवण्यासाठी अंबाडी, सूर्यफुलाच्या बिया आणि तेलबिया यांचा आहारात समावेश करावा. तसेच आपण त्यात सब्ज्याचा बियांचा देखील समावेश करू शकतो. तुम्ही या बिया रोज भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाऊ शकता..

ओव्याचे पाणी प्या –

ओव्याचे पाणी हे काही प्रमाणात PCOS नियंत्रित करते. ओव्याच्या सेवनाने पचन चांगले होते. ओवा मासिक पाळीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि तणाव कमी करून हार्मोनल आरोग्य देखील सुधारते. याशिवाय, ओवा हा एंटी इंफ्लेमेटरी आहे जो पीसीओएसला नियंत्रित करु शकतो.

उच्च फायबरयुक्त पदार्थ खा

दररोजच्या आहारात भरड धान्यांचा वापर करू शकतो. ज्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. जसे- बाजरी, ज्वारी. हे खाल्ल्यानंतर तुम्हाला पीसीओएसची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. यशिवाय फायबर, ब्रोकोली आणि केळी यासारखी फळे पीसीओएसची समस्या कमी करण्यास मदत करू शकतात.

कॅमोमाइल चहा प्या-

कॅमोमाइल टी पीसीओएसवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर हे स्ट्रेस बूस्टरचेही काम करते. हे हार्मोनल आरोग्यासाठी खूप चांगले आहे. तसेच यामुळे मासिक पाळी येण्याची समस्याही कमी होते. झोप सुधारण्यात आणि हार्मोनल असंतुलन सुधारण्यात या चहाची खूप मदत होते. अशा प्रकारे तुम्ही PCOS ची समस्या नियंत्रित करू शकता.