कपड्यांना दुर्गंधी येत असल्यास हे करून पहा

कपड्यांना येणारी दुर्गंधी टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. कपड्यांमध्ये ओलावा राहिल्यास दुर्गंधी येऊ शकते. कपडे फोल्ड करण्यापूर्वी किंवा ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा. शक्य असल्यास, त्यांना बाहेर उन्हात वाळवा.

कपडे काढण्यासाठी तुम्ही टायमर लावू शकता. वॉशिंग मशीनमध्ये जिवाणू आणि बुरशी वाढू शकतात, ज्यामुळे कपड्यांना वास येऊ शकतो. त्यामुळे मशीन स्वच्छ आणि कोरडी ठेवा. कपड्यांमधून येणारा वास काढण्यासाठी, ते धुण्यापूर्वी बेकिंग सोडा किंवा व्हिनेगरमध्ये भिजवा. त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणार नाही. कपडे उन्हात ठेवल्यास कपड्यांना दुर्गंधी येत नाही.