
शरीरामध्ये रक्ताची कमतरता आल्यास अशक्तपणा आणि अन्य आजार होऊ शकतात. त्यामुळे पालक, ब्रोकली भाज्या खा. मसूर, हरभरा, डाळी आणि कडधान्यांमध्ये लोह व प्रथिने भरपूर असतात. तुम्ही जर मांसाहारी असाल तर मांस, मासे आणि अंडी खाऊ शकता.
व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने रक्त वाढते. यामध्ये संत्री, लिंबू, बेरी फळे खा. पेरू, पपई, किवी, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने व्हिटॅमिन सी शरीराला मिळते. अनार म्हणजेच डाळिंब खाल्ल्यानेही रक्त निर्मितीला चालना मिळते. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
























































