मालिकेत चुंबन दृश्य, नाराज वडीलांमुळे अभिनेत्रीने मालिका सोडण्याच्या तयारीत

63

सामना ऑनलाईन, मुंबई

एका हिंदी मालिकेमध्ये चुंबन दृश्याचा समावेश करण्य़ाचं निर्माता दिग्दर्शकाने ठरविले. ही बातमी मालिकेच्या नायिकेच्या वडीलांना कळताच त्यांनी माझ्या मुलीला असली दृश्य करू देणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलं. वडीलांच्या या भूमिकेमुळे निर्माता-दिग्दर्शकांना नवी अभिनेत्री शोधावी लागणार आहे. जन्नत झुबेर असं या अभिनेत्रीचं नाव असून तिचं वय फक्त १६ वर्ष आहे. या वयामध्ये तिच्या वाटेला असली दृश्य येऊ नये असं वाटत असल्याचं तिच्या वडीलांनी म्हटलं आहे.

‘तू आशिकी है’ या मालिकेमध्ये जन्नत आणि अभिनेता ह्रितीक अरोरा या दोघांमधील प्रणयदृश्य दाखवण्याचं ठरलं होतं. हे कळताच तिच्या वडीलांना आक्षेप घेतला आणि म्हटलं की जन्नत ही उत्तम कलाकार आहे. मालिकाविश्वात पाय ठेवताना तिने काय करावं आणि काय करू नये याबाबतीत आमची काही ठाम भूमिका होती. जी मागणी निर्माता-दिग्दर्शकांनी केली आहे ती न पटणारी असल्याने आपण विरोध केला असल्याचं तिच्या वडीलांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या